भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजारामासी दोघी कृष्णा राधा नामे होत्या हो कामीनी

rajaramasi doghi krushna radha name hotya ho kamini

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
राजारामासी दोघी कृष्णा राधा नामे होत्या हो कामीनी।।१।। चाकरीस जाती हंगाबादेसी शीलेदारी काम करीता जाण||२|| विठाबाई म्हणे तैलंगदेशाचा । कृष्णभट्ट ब्राह्मण आला तेथे ॥३॥ चिदंबराचि खूण सर्व सांगतो जाण । अवतारपूर्ण श्रीकृष्ण तो ।।४।। जावे तुवा तेथे चरण देखता त्याचे होईल तुमचे शांती जाण ॥५॥