भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी विलास विटंबना

rajala alas sannyashala sayas | vidhavesi vilas vitambana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी विलास विटंबना ॥१॥ व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा । विटंबना ॥२॥ दानेंविण पाणी । घ्राणेविन घाणी । नामेंविण वाणी विटंबना ॥३॥ एका जनार्दनीं भावभक्तीविणा । पुण्य केलें नाना विटंबना ॥४॥