भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्रंदिवस मनीं करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझें

ratrandivas manin karitase chinta | kay he ananta karma majhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रात्रंदिवस मनीं करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझें ॥१॥ माझीया अदृष्टीं नाही पुत्रसुख । नित्त्यानित्य दु:ख आम्हालागीं ॥२॥ चालेना व्यापार मज न चले युक्ति । कैशी आतां गति नामयाची ॥३॥ येणे धरिला छंद विठ्ठलाचा मनीं । एका जनार्दनीं काय करुं ॥४॥