भजनी मालिका

भजने

आत्मा तो देहीं नाशिवंत नाहीं । आशाश्वत पाहीं कलेवर ॥१॥ उमजोनी उमजोनी झाकिती डोळे । बळेंचि अंधळे होती मूर्ख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा ॥१॥ असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्‍टी देखण्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आत्मिस्थति मज नको हा विचार । देई निरंतर चरणसेवा ॥१॥ जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हे चि गोडी आम्हां देई जीवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आदरें जपतां केशवाचें नाम । वैकुंठ हें धाम पायां पडे ॥१॥ आणिक सायास करुनि कदापि । चौर्‍यांशींच्या सिपीं गुंफीं नका ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आदि अंत नाहीं जयाचे रुपासी । तोचि संतापाशीं तिष्ठतसे ॥१॥ गातां गीतीं साबडें भावें तें कीर्तन । तेथें नारायण नाचतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आदि गुरु शंकर ब्रह्माज्ञान खूण । बाणली पैं पुर्ण मत्स्येंद्रनाथीं ॥१॥ मत्स्येंद्र वोळला गोरक्ष बोधिला । ब्रह्माज्ञान त्याला कथियेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आदि नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा । गोप गोधनें गौळणीयांसी लाविला चाळा ॥१॥ मनमोहन कृष्ण यशोदेचा बाई । चोरी करी नानापरी धरितां न सांपडे बाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आदि पुरुष सबरा भरीत भरला । भरुनि उरला पंढरीये ॥१॥ आतळ वितळ सुतळ रसातळ । सप्ताहि पाताळें भरुनि उरला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ