भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि पुरुष सबरा भरीत भरला । भरुनि उरला पंढरीये

adi purush sabara bharit bharala | bharuni urala pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आदि पुरुष सबरा भरीत भरला । भरुनि उरला पंढरीये ॥१॥ आतळ वितळ सुतळ रसातळ । सप्ताहि पाताळें भरुनि उरला ॥२॥ वैंकुंठ कैलास चतुर्दश लोक । भरलासे व्यापक दशदिशां ॥३॥ एका जनार्दनीं स्थावर जंगमीं । भरलाअसे व्योमीं आदि अंतीं ॥४॥