भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मा करी ना करवी । अलिप्तपणें वर्ते जीविं

atma kari na karavi | aliptapanen varte jivin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आत्मा करी ना करवी । अलिप्तपणें वर्ते जीविं ॥१॥ साक्ष नव्हे ना असाक्ष । उपेक्षा करीना कैंपक्ष ॥२॥ जैसें गगनीं अभ्र गळें । गगन अलिप्त त्यावेगळें ॥३॥ निळा म्हणे सन्निधानें । लोह चाले चुंबक नेणें ॥४॥