भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मा केवळ एकला एक । तेथें सुखदुःख कैंचे

atma keval ekala ek | tethen sukhaduhkh kainche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आत्मा केवळ एकला एक । तेथें सुखदुःख कैंचे ॥१॥ आत्मा सुखदुःखावेगळा । हें तों न कळे कळा तयाची ॥२॥ म्हणे जनार्दनाचा एका । आत्मा देखाक सर्वघटीं ॥३॥