भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मा निघोट निर्मळ । नातळे तो मायामळ

atma nighot nirmal | natale to mayamal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आत्मा निघोट निर्मळ । नातळे तो मायामळ ॥१॥ जेवीं मृगजळातें भानु । प्रगटूनियां वेगळा भिन्नु ॥२॥ आत्मबिंब नव्हे छाया । तैसीं स्वरुपीं मिथ्या माया ॥३॥ निळा म्हणे हें स्वानुभवें । विचारितां होईल ठावें ॥४॥