भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा । गोप गोधनें गौळणीयांसी लाविला चाळा

adi natak sarva vyapak vyapuni nirala | gop godhanen gaulaniyansi lavila chala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आदि नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा । गोप गोधनें गौळणीयांसी लाविला चाळा ॥१॥ मनमोहन कृष्ण यशोदेचा बाई । चोरी करी नानापरी धरितां न सांपडे बाई ॥२॥ जयाचे विंदान न कळे ब्रह्मादिकां वो माये । ठकविलें देवा आपणाचि काला खाये ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा चौदेहा वेगळा । पुराणें वेडावलीं न कळे अगम्य ज्याची लीला गे माये ॥४॥