भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदरें आवडी गाती जे नाम । तया न बाधी क्रोध काम

adaren avadi gati je nam | taya na badhi krodh kam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आदरें आवडी गाती जे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥ नाम आठव नाम अठवा । हृदयीं सांठवा रामनाम ॥२॥ संत समुदाय वंदावे आवंडीं । अंतरीची गोडी नित्य नवी ॥३॥ एक जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिला डोळां धन्य झालों ॥४॥