आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम
athavan ti hich aso | vache vaso harinam
आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥ काया वाचा आणि मन । करुं कीर्तन धुमाळी ॥२॥
athavan ti hich aso | vache vaso harinam
आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥ काया वाचा आणि मन । करुं कीर्तन धुमाळी ॥२॥
athavala to majhiye manin | katin kar donhi vasavita
आठवला तो माझिये मनीं । कटीं कर दोन्ही वसविता ॥१॥ न गमे दिवस न गमे राती । लागते खंती फुटे ॥२॥
athava athava velovela athava | shrikrushna athava velovelan
आठवा आठवा वेळोवेळा आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥ कलीमाजीं सोपें आठवा आठवण । पावन तो जन्म आठव्यानें ॥२॥
athavaven hariche gun | tenen mana samadhan
आठवावें हरीचे गुण । तेणें मना समाधान ॥१॥ मग न जाय सैरावैरा । चुके जन्माच्या वेरझारा ॥२॥
athavitan tumachi lila | karitan dasacha sohala
आठवितां तुमची लिळा । करितां दासाचा सोहळा ॥१॥ ऐसा स्वाभाविक गुण । वसे तुम्हां अंगीं पूर्ण ॥२॥
athavitan dattatray | nasatati tapatray
आठवितां दत्तात्रय । नासताती तापत्रय ॥१॥ प्राप्त होय ऋद्धिसिद्धि । दत्तनामें ती समाधी ॥२॥
athavitan namen sukhachi santushti | labhen labh koti sukrutacha
आठवितां नामें सुखची संतुष्टी । लाभें लाभ कोटी सुकृताचा ॥१॥ म्हणऊनि हाचि घेऊनियां छंद । गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥२॥
athavitan nupure movita na movave
आठवितां नुपुरे मोविता न मोववे । सांगतां न सांगवे गुण त्याचे ॥१॥
athavitan yache pay | gelen nirasoni sansarabhay
आठवितां याचे पाय । गेलें निरसोनि संसारभय ॥१॥ अवघा काळ अवघी वेळ । स्मरणें याचिया सुमंगळ ॥२॥
athavitan visarale apuliya gota
आठवितां विसरले आपुलिया गोता । हरिनामें त्त्वरिता मोक्ष जाला ॥१॥
athavitanchi rup manin | jay kalpana vironi
आठवितांचि रुप मनीं । जाय कल्पना विरोनी ॥१॥ आतां तूंचि तूं आवघा । मी हें नुरे माझिया भावा ॥२॥
athaviton tunchi javalike
आठवितों तूंचि जवळिके । नाठवशी तरी निजसुखें ।
athavi govind veloveli vachen | tenen ya dehanche sarthak hoy
आठवी गोविंद वेळोवेळी वाचें । तेणें या देहांचे सार्थक होय ॥१॥ विठ्ठल विठ्ठल मनीं निरंतर साचा । काय मने वाचा छंद त्यांचा ॥२॥
athavin tanv tunchi javalike
आठवीं तंव तूंचि जवळिके नाठविसि तरी निजमुखें ।
athavunchi nendi avadi anik | bharuniyan lok tinhi rahe
आठवूंचि नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥ मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥
athave dev to karava upav | yer tajin vav khatapata
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥१॥ होई बा जागा होई बा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
athave samadhiche ang ale tuj
आठवे समाधीचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ॥१॥
ad pade kadi | tari te bahut pani khodi
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥ दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥
adakalen devadvar | vyartha kay karakar
आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥
adakya karanen jiv jat | mhanati amhi udar bhakta
आडक्या कारणें जीव जात । म्हणती आम्ही उदार भक्त ॥१॥ ऐसिया दांभिकांसी । दुरी होय हरी त्यांसी ॥२॥