भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवितां नुपुरे मोविता न मोववे

athavitan nupure movita na movave

आठवितां नुपुरे मोविता न मोववे । सांगतां न सांगवे गुण त्याचे ॥१॥ परतालिया दृष्टि काळा देखिला जगजेठी । वेणिभागीं पृष्ठीं कैसा दिसतु असे ॥ध्रु०॥ त्या गुणाच्या संगें कैसें अद्वैत जालें । मन म्हणौनि काळेंपण बहु झालें गे माये ॥२॥ पुरेपुरे बुध्दि निमाली वेदवाणी । आतां केवीं वर्णू चक्रपाणी बहु काळें गे माये ॥३॥ द्वादश मंडळे वोवाळुनि आलिये । तंव तंव काळें देखिलें रुपडें त्याचें ॥४॥ अनुमाना नये अनुमाना । परतल्या श्रुति चोजवेना ॥५॥ मनें बुडी दिधली दाही हारपली । चोवीस मावळलीं अगाध पंथी ॥६॥ प्रीतीचें पांघरुण काळें घोंगडें । रखुमादेविवरें विठ्ठलें मज केलें उघडें ॥७॥