भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवी गोविंद वेळोवेळी वाचें । तेणें या देहांचे सार्थक होय

athavi govind veloveli vachen | tenen ya dehanche sarthak hoy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आठवी गोविंद वेळोवेळी वाचें । तेणें या देहांचे सार्थक होय ॥१॥ विठ्ठल विठ्ठल मनीं निरंतर साचा । काय मने वाचा छंद त्यांचा ॥२॥ त्याविण आणिक दैवत पै नाहीं । आणिक प्रवाहि गुंतुं नको ॥३॥ सर्व सुखाचा विठ्ठल सांगाती । एक जनार्दनीं भ्रांती काढी काढी ॥४॥