भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवितों तूंचि जवळिके

athaviton tunchi javalike

आठवितों तूंचि जवळिके । नाठवशी तरी निजसुखें । आठऊं ना विसरु पाहे । तंव सगुणचि ह्रदयी एक रया ॥१॥ तुझ्या नामाचा आठऊ रुपाचा आठऊ । ध्यानांचा आठऊ । असे मना रया ॥२॥ विसर पडावा संसाराचा । आठऊ हो तुझिया रुपाचा । येथें नाम रुप ठसा ह्रदयीं राहो । जिवाचिया जिवलगा । माझिया श्रीरंगा । गोडी घेऊनियां । द्वैत नाहीं पाहो रया ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला । सगुणी सुमन गुंफिली प्रीति । आवडे तो कोंदाटले सुमन हें विरालें । जाली नामरुपीं ऐक्य भेटी । नाम रुप सार जाणोनि जीवन । संसारा जालिसे तुटी रया ॥४॥