भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवे समाधीचे अंग आले तुज

athave samadhiche ang ale tuj

आठवे समाधीचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ॥१॥ हेचि गुहाज्ञान पार्वतीसी दिले । मच्छिंद्रा लाधले हेंचि ज्ञान ॥२॥ मच्छिंद्राने दिले गोरक्षाचें हातीं । तेंचि चौरंगी प्रती उपदेशिले ॥३॥ चौरंगीने दिले भर्तरीचे हाती । तेणे गैनीप्रती उपदेशिले ॥४॥ बाप रुक्मादेवी निवृत्ति दयाळा । त्यांनीच आपणांसी उद्धरिले ॥५॥ ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई । निवृत्तींचे पावी सर्व सुख ॥६॥