भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवितां नामें सुखची संतुष्टी । लाभें लाभ कोटी सुकृताचा

athavitan namen sukhachi santushti | labhen labh koti sukrutacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आठवितां नामें सुखची संतुष्टी । लाभें लाभ कोटी सुकृताचा ॥१॥ म्हणऊनि हाचि घेऊनियां छंद । गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥२॥ ज्याचिया व्दैतबाध । अवघाचि उपाध माया भ्रांती ॥३॥ निळा म्हणे नित्य वैष्णवां साधन । हेंचि अनुसभान दिवसराती ॥४॥