भजनी मालिका
← भजनांकडे परत

आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी

ad pade kadi | tari te bahut pani khodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥ दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥ एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥२॥ तुका म्हणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड ॥३॥