भजनी मालिका

भजने

नाहीं आमुचे दैवीं त्याणें कोठोनी द्यावें । व्यर्थ कां रुसावें देवावरी ॥१॥ न करितां खेद पुढें वाट चाले । गौरक्षक भेटले तयालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाहीं उरविलें दुजें । तुमच्या तेजें झांकोळिलें ॥१॥ माझीचि मज न दिसतीं । निजांगें दीप्ति प्रकाशें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहीं कोठें गोंविला हेत । ठेविलें चित्त याचिवरी ॥१॥ सगुण सुंदर देखिलें दिठीं । विटे नेहटी तेंचि पुरे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहीं कोणा उपेक्षिलें । सकळां सन्मानें स्थापिलें । आपुलिये पदीं बैसविलें । देणे दिधलें अपार ॥१॥ चुळा एका दुधासाठीं । स्तवितांचि उपमन्यें जगजेठी । करुनियां क्षिराब्धीची वाटी । लाविली ओठी तयाचिये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा