भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं आकाश घडणी । पाहा स्वरूपाची खाणी

nahin akash ghadani | paha svarupachi khani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाहीं आकाश घडणी । पाहा स्वरूपाची खाणी ॥१॥ स्वरूप हें अगोचर । गुरू करिती गोचर ॥२॥ गोचर करिताती जाणा । द्दष्टि दिसे निरंजना ॥३॥ नाहीं हात पाय त्यासी । जनी म्हणे स्वरूपासी ॥४॥