भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं घडली कमाई तैसी । मागें जैसी संतांची

nahin ghadali kamai taisi | magen jaisi santanchi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं घडली कमाई तैसी । मागें जैसी संतांची ॥१॥ म्हणोनियां उपेक्षिलें । ऐसिये लोटिलें भवार्णवीं ॥२॥ जे काम कोधा ऐसे । कवळती भासे जलचर ॥३॥ निळा म्हणे काढील कोण । येथें धांवोन मज आतां ॥४॥