भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं केली तुझी सेवा । दु:ख वाटतसे माझे जिवा

nahin keli tujhi seva | du:kha vatatase majhe jiva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाहीं केली तुझी सेवा । दु:ख वाटतसे माझे जिवा ॥१॥ नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥ जें जें दु:ख झालें मला । तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥३॥ रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं लागलासी ॥४॥ क्षमा करावी देवराया । दासी जनी लागे पायां ॥५॥