भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं

nahin janin vijanin vidnyanin

नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं । निर्गुण काहाणीं आम्हां घरीं ॥ १ ॥ सुलभ हरि दुर्लभ हरि । नांदे माजघरी आमचीये ॥ २ ॥ आनंदे सोहळा उन्मनीचि कळा । नामचि जिव्हाळा जिव्हे सदा ॥ ३ ॥ निवृत्ति देवीं धरिली निर्गुणीं । शांति हे संपूर्णी हरीप्रेमें ॥ ४ ॥