भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं कोणा उपेक्षिलें । बहुतां केलें सनाथ

nahin kona upekshilen | bahutan kelen sanath

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं कोणा उपेक्षिलें । बहुतां केलें सनाथ ॥१॥ माझेचि विशीं आळस केला । कां जी विठठला मी नेणें ॥२॥ प्रालब्धाचा ठेवा जैसा । आम्हां तैसा ओढवला ॥३॥ निळा म्हणे गेलों वायां । तुमच्या पायां न देखतां ॥४॥