भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं जाय भाव पोटीं । तया चावटीं वाटे नाम

nahin jay bhav potin | taya chavatin vate nam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाहीं जाय भाव पोटीं । तया चावटीं वाटे नाम ॥१॥ परी येतां अनुभव । चुकवी हाव संसार ॥२॥ वेरझारीं पडे चिरा । नाहीं थारा जन्माचा ॥३॥ एका जनार्दनीं खंडे कर्म । सोपें वर्म हातां लागें ॥४॥