भजनी मालिका

भजने

तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्पपणे । नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें । भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें । विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥ आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्वहीन । दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तेणें सुखें माझें निवविलें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥ कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तेथें रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीतादेवी ॥१॥ देवी दुंदुभीं वाजविल्या अपार । तेव्हां कळों सरे भार्गवासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरीनामें ॥१॥ दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव ॥१॥ म्हाळसेलागीं पूजा केली असे निगुतीं । राहिले दहा रात्रीं ह्रषिकेशी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेरा दिवस जाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥ पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी झालें तुज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तेरा माजी तीन सात साक्षाक्तार । आठव निर्धार असी पद ॥१॥ नवमापासूनि दशमाचे अंतीं । बारावा निश्चिती योग जाणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तिपांग काई ॥१॥ धांवा केला आतां येईल धांवोन । येथे काही करणे न लगे संदेह ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तेव्हां प्रश्र करी पार्वती आदरें । शिवाप्रती कर जो-डोनियां ॥१॥ सांगावाजी स्वामि ऐसा इतिहास । गातां जोडे वास तुझे पायीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेसेच निघाले रानामाजी पूर्ण मुखी विठ्ठलचूर्ण धरोनीया ॥१॥ मूर्ती घेवोनी होती आले डोंगरावरती। वाट नाही दिसती कोठे मजसी ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

तेहतीस कोटी देव बांदवडी लंका बंदीखान । गडलंका बंदीखान बंदिमोचन रामचिंतन देव करिती ध्यान । अंत गती सीता सती चोरुनी नेली जाण । अठरा पद्मे वानर भार वीरचालिला दारुण राम चालिले आपण ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

तेहतीस कोटींची केली सोडवण । तो हा राम जपून धरा वेगीं ॥१॥ राघवाचें नाम वाचेसी उच्चारा । निजाचा सोयरा रामचंद्र ॥२॥

रचनाकार: संत नामदेव