भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेसेच निघाले रानामाजी पूर्ण मुखी विठ्ठलचूर्ण धरोनीया

tesech nighale ranamaji purna mukhi viththalachurna dharoniya

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
तेसेच निघाले रानामाजी पूर्ण मुखी विठ्ठलचूर्ण धरोनीया ॥१॥ मूर्ती घेवोनी होती आले डोंगरावरती। वाट नाही दिसती कोठे मजसी ॥२॥ देहबहुत क्षीण आज उद्या प्राण जाऊ पाहतो प्राण पांडुरंगा ॥३॥ विठाबाईची आली शेवटील वेळ कैसे म्हणु दयाळ तुला देवा ||४|| चिदंबरनाम गात फीरतो जाणा अवतार पूर्ण नामदेव ॥५॥ येईल हो आता कुंदगोळी जाणेसी हेची वाट त्याची खूण जाण ॥६॥ त्याचबरोबर जावे तुवा | तेथे। सांगोनी अद्रश्य होती देव ॥७॥