भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेरा माजी तीन सात साक्षाक्तार । आठव निर्धार असी पद

tera maji tin sat sakshaktar | athav nirdhar asi pad

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तेरा माजी तीन सात साक्षाक्तार । आठव निर्धार असी पद ॥१॥ नवमापासूनि दशमाचे अंतीं । बारावा निश्चिती योग जाणा ॥२॥ प्रथम अक्षरीं मध्यमा सूचना । नाम नारा-यणा अंतकाळीं ॥३॥ नामा म्हणे तुह्मी नाम स्मरा मनीं । वैकुंठ-भुवनीं वास होय ॥४॥