भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तिपांग काई

tevhan dhalen pot baisalon pangati | atan amhan muktipang kai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तिपांग काई ॥१॥ धांवा केला आतां येईल धांवोन । येथे काही करणे न लगे संदेह ॥ध्रु.॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ। आनंदें सकळ भरी आलें ॥२॥ देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥३॥ तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात। प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥४॥ तुका म्हणे आह्मीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥५॥