भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेथें नाहीं मोल मायाचि गणना

tethen nahin mol mayachi ganana

तेथें नाहीं मोल मायाचि गणना । आपण येसणा ब्रह्मघडु ॥१॥ तें रूप साजिरें निर्गुण साकार । देवकीबिढार सेवियेले ॥२॥ नसंपडे ध्याना मना अगोचर । तो गोपवेषधर गोकुळीं रया ॥३॥ निवृत्ति धर्मपाठ गयनी विनट । कृष्ण नामें पाठ नित्य वाचा ॥४॥