भजनी मालिका

भजने

ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले ॥१॥ करिती पूजन आणि कांची स्तुती । दैन्यवाणे होती अंतकाळीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्याचे मुखीं नाम तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥१॥ नामसंकीर्तन नित्य नाम वाचे । दहन पापाचें एका नामें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणें । मुक्तीसी स्थापणें मुक्तत्वीं ॥१॥ तो हा जगज्जनक मुरारी । उभा भीमातीरीं पंढरिये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥१॥ आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजियाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥१॥ सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ज्यातें ध्यानीं ध्याती योगी । तो मज येतो भेटीलागीं ॥१॥ तया रामासी विन्मुख होणें । जळो जिणें लाजिरवाणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥ मन येथें साह्य जालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ज्यालागीं जोडिसी ते न येती तुजसरसीं । यम कासाविसी करी तये वेळां ॥१॥ तूं तरी अज्ञान न देखसी डोळा । झालसि गोठोळा धनगरांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्यासी आत्मलाभ झाला । त्याचा देह प्रारब्धे वर्तला । कायावाचामनें आपुला व्यापार करिताती ॥१॥ होतें हाणितलें तोंडावरी । तेथें इंद्र अग्नि झुंजारी । पैं शुन्य बोले परस्परी । अग्नीसी इंद्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं ॥१॥ तरीच होय मनः शुद्धी । सहज तुटती आधि व्याधि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्यासी दहा शिरें माथां । वीस हातीं येतां । नेदुनी सर्वथा । जीवें मारी ॥१॥ गांठी घ्यावया नाहीं । आतां करील काई । म्हणोनि राखी गाई । गवळीयांच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ