भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां

jyane ad yaven kanhin | tyachen nahin bal atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥ मन येथें साह्य जालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥ चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥२॥ तुका म्हणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥३॥