भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणें । मुक्तीसी स्थापणें मुक्तत्वीं

jyache moksha mokshatva denen | muktisi sthapanen muktatvin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणें । मुक्तीसी स्थापणें मुक्तत्वीं ॥१॥ तो हा जगज्जनक मुरारी । उभा भीमातीरीं पंढरिये ॥२॥ जेणें शातिसी शांतीपद । दिधला आनंद आनंद ॥३॥ निळा म्हणे जेणें वेद । केला प्रबुध्द पढवूनी ॥४॥