भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यातें ध्यानीं ध्याती योगी । तो मज येतो भेटीलागीं

jyaten dhyanin dhyati yogi | to maj yeto bhetilagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्यातें ध्यानीं ध्याती योगी । तो मज येतो भेटीलागीं ॥१॥ तया रामासी विन्मुख होणें । जळो जिणें लाजिरवाणें ॥२॥ व्रतें तपें ज्या साधिती । तो मज नित्य ध्यातो चित्तीं ॥३॥ जो अगम्य वेद पुराणां । तो मज येतो समरंगणा ॥४॥ नामया स्वामीच्या दर्शनें । मग कैंचि भवबंधनें ॥५॥