भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे मुखीं नाम तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं

jyache mukhin nam tochi ek dhanya | tyachen shuddha punya iye janin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्याचे मुखीं नाम तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥१॥ नामसंकीर्तन नित्य नाम वाचे । दहन पापाचें एका नामें ॥२॥ ऐसा जो अखंड जपे रामनाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥३॥ नामा म्हणे नाम विठठलाचें जपा । हाचि मार्ग सोपा परब्रह्मीं ॥४॥