भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे पुराणीं पोवाडे । तो हा उभा वाडेंकोंडें

jyache puranin povade | to ha ubha vadenkonden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्याचे पुराणीं पोवाडे । तो हा उभा वाडेंकोंडें ॥१॥ कटीं कर ठेवुन गाढा । पाहे दिगंबर उघडा ॥२॥ धरुनी पुंडलिकाची आस । युगें जाहलीं अठ्ठावीस ॥३॥ तो हा देव शिरोमणी । एका शरण जनार्दनीं ॥४॥