भजनी मालिका

भजने

चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि प्रतापें तरली भवसागर शीळा ॥१॥ जयजय रामरामा शामा भवभंजन नांवें । तुझे रुप ध्यातां उमा शिवे निवे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरुनी जीवीं ॥१॥ यापरतें साधन न करीं तुझीं आण । हाचि परिपुराण नेम माझा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चरणासीं शरण तुझिया जे येती । तेचि उतरती भवसिंधू ॥१॥ लक्षुमीनें ज्यातें असे आराधिलें । ठेवीं तीं पाउलें स्तनावरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चरणीं ठेउनि माथा संतांसी पूजावें । उगेंचि ऐकावें हरिकीर्तन ॥१॥ कलीमाजीं श्रेष्ठ कलीमाजी श्रेष्ठ । कीर्तन बोभाटें पळतीं दोष ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें । गरुडपारीं केलें रामतीर्थ ॥ १ ॥ भागीरथीतीरीं राम धनुर्धारी । अहिल्या उद्धरी क्षणमात्रें ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥१॥ आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥ कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ