भजनी मालिका
← भजनांकडे परत

चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवर पाहूं

chala pandharisi jaun | rakhumadevivar pahun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवर पाहूं ॥१॥ स्नान करूं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥ डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा ॥३॥ ऐसा निश्चय करुनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥