भजनी मालिका
← भजनांकडे परत

चला पंढरीसी जाऊं। रखुमादेवीवर पाहूं

chala pandharisi jaun| rakhumadevivar pahun

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
चला पंढरीसी जाऊं। रखुमादेवीवर पाहूं ।। १॥ स्नान करूं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥ डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा॥3॥ ऐसा निश्चय करुनी म्हणे नामयाची जनी ॥४॥