भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरफडें चरफडें शोकें शोक होय

charaphaden charaphaden shoken shok hoy

चरफडें चरफडें शोकें शोक होय । कार्यमुळ आहे धीरापाशी ॥१॥ कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥२॥ न चुके होणार सांडिल्या शुरत्वा । फुकटचि सत्त्वा होईल हीना ॥३॥ तुकयाबंधु म्हणे दिल्या बंद मना । वांचुनी निधाना न पावीजे ॥४॥ श्रीतुकोबांच्या वियोगामुळें कन्होबाचें । श्री विठ्ठलाशीं कठोर भाषण