भजनी मालिका

भजने

अमृत अव्हेरें उचंबळलें आतां । विष आर्त भूतां आवश्यक ॥१॥ आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी ॥१॥ अळंकार सोनें काय तें वेगळें । डोळियां बुबळें वेगळिक ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अमृत टाकुन कांजीची आवडी । साजेना झोपडी काय त्याला ॥१॥ खरासी अखंड गंगेचें हो स्नान । गेलें वायांविण जिणें त्याचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अमृत तें स्वर्गी निर्जर सेविती । परि चरफडती नामामृत ॥१॥ धन्य ते दैवाचे नाम घेती वाचे । होतें पैं जन्माचें सार्थक तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥१॥ नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥ ऐसियांचा संग देई नारायणा । वोलाचा वचना जयांचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही । अमरनाथा तेही गोड नसे ॥१॥ नारदातें प्रश्न करी अमरनाथ । शुध्द हें अमृत कोठें होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव