भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती

amruta unen anita santajan | nam amrut khun pajitati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥१॥ नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥२॥ नाशिवंत देह नाशिवंत जीव । नाशिवंत ठाव जगडंबर ॥३॥ एका जनार्दनीं संताचिये दृष्टी । नाशिवंत सृष्टी सजीव होती ॥४॥