भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमित्य भुवनीं भरलें शेखीं जें उरलें

amitya bhuvanin bharalen shekhin jen uralen

अमित्य भुवनीं भरलें शेखीं जें उरलें । तें रुप आपुले मज दावियलें वो माय ॥१॥ आतां मी नये आपुलिया आस । तुटले सायास भ्रांतीचे वो माय ॥२॥ मंजुळ मंजुळ वायो गती झळकती । तापत्रयें निवृत्ति निर्वाळिलें वो माय ॥३॥ वेडावलें एकाएकीं निजधाम रुपीं । रखुमादेविवरु दीपीं दिव्य तेज वो माय ॥४॥