भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही । अमरनाथा तेही गोड नसे

amrutasi rog svargi jahala pahi | amaranatha tehi god nase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही । अमरनाथा तेही गोड नसे ॥१॥ नारदातें प्रश्न करी अमरनाथ । शुध्द हें अमृत कोठें होय ॥२॥ सांगे तये वेळीं ऐका हें भूतळीं । सांगेन नव्हाळी तुम्हांपाशीं ॥३॥ पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी पुडलिकाचे द्बारीं देव उभा ॥४॥ अनाथाचा नाथ विटेवरी उभा । एका जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥५॥