भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेह गमाविला

amrut vikuni kanji pyala | taisa naradeh gamavila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेह गमाविला ॥१॥ लाहोनी उत्तम शरीर । वेंचिलें ते विषयपर ॥२॥ ऐशी मूर्खाची गोष्टी । एकनाथ देखोनि होतसे कष्टी ॥३॥