भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृत टाकुन कांजीची आवडी

amrut takun kanjichi avadi

अमृत टाकुन कांजीची आवडी साजेना झोपडी काय त्याला ॥१॥ खरासी अखंड गंगेचें हो स्नान । गेलें वायांविण जिणें त्याचें ॥२॥ पोवळ्यापरिस दिसती रानगुंजा शृंगाराच्या काजा न येती त्या ॥३॥ आनारा परिस चोखट इंद्रावन चवी कडुपण हीन त्याचें ॥४॥ रंगाची बाहुली दिसती साजिरी । बेगडाचे परी नग ल्याली ॥५॥ म्हणे मुक्ताबाई पुरे तें दर्शन । गुरुविण संतपण आहे कोठें ॥६॥