भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृताची कुंडी निद्रिस्तां मरण

amrutachi kundi nidristan maran

अमृताची कुंडी निद्रिस्तां मरण । झणे त्या दुषण बोलसी रया ॥१॥ वासना संग धीट प्रकृति कनिष्ठ । भोगुनि वैकुंठ जन्म घेती ॥२॥ तैसें नव्हे सारासार तत्त्व निवृत्ती । बुडउनि प्रवृत्ति आपण नांदे ॥३॥ ज्ञानदेव बोले अमृत सरिता सर्वाघटीं पुरता हरि नांदे ॥४॥