भजनी मालिका

भजने

गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गरुडावरी हरि बैसोनियां यावें । आम्हांसि रक्षावें दीनबंधू ॥१॥ अच्युता केशवा मुकुंदा मुरारी । येई लवकरी नारायणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गरुडासि मग म्हणे पांडुरंग । साकल्य हें सांग पुंडलिका ॥१॥ नामदेव कष्टी ज्ञानदेवासाठीं । घेऊन या तो भेटी नामयाच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गरुविण प्राणी त्या होय जाचणी । सत्य माझी वाणी मिथ्या नव्हे मिथ्या नव्हे सत्य सांगतो तुम्हाला अंती यमघाला चुकेना की चुकेना की यमयातना या जना ।

रचनाकार: संत रामदास

गर्जत नामाच्या कल्लोळीं । आले महीतळीं उध्दरित ॥१॥ ते हे वीर वैष्णव गाढे । कळिकाळ त्यांपुढें तृणप्राय ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गर्जता जाती ब्रम्हानंदें । हरिची पदें हरिभक्त ॥१॥ धाक त्यांचा कळिच्या काळा । कांपे चळचळां देखोनि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्मे शुभाशुभें ॥१॥ रिघाले अवघियां बाहेरी । विठ्ठल अंतरीं धरुनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गर्दभाचे अंगीं चंदनाची उटी । व्यर्थ शीण पोटीं लावूनियां ॥१॥ श्वान तो भोजनीं बैसविली अढळ । परी वोकावरी ढाळ जाऊं नेदी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गर्भवासा भीती ते अंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं आम्हां ॥१॥ गर्भवास झालिया संतसेवा घडती । मुक्त जालिया न कळे भगवद्भक्ती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गर्भवासीचें दुःख सांगतां आटक । मलमुत्र दाथरीं जननीं जठरीं अधोमुख ॥१॥ शिव शिव सोहं सोहं । कोहं कोहं सांडुई पाहे निज जीवन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गव्हंची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्नें तै होतीं ॥१॥ ऐसा नरदेह उत्तम जाण । वाचे वदे नारायण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गहिनीनाथें मज सांगितलें सार । केली ज्ञानेश्वरें व्याख्या त्याची ॥१॥ काढिला शोधून अनुभव मुक्ताईनें । ते ज्ञान सोपानें संपादिलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गाइलेचि गातां गीतीं । पवाडे तुमचेंचि श्रीपती । सहसा धणी न पुरे चित्तीं । सरितां रातिदिवस युगें ॥१॥ अनंता युगी अनंत खेळ । अनंता नामा रुपांचे मेळ । अनंत संपादिलें जे निर्मळ । पढतां वाचे उल्हासु ॥२॥

रचनाकार: संत निळोबा