भजनी मालिका
← भजनांकडे परत

गव्हंची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्नें तै होतीं

gavhanchi rashi jodilya hatin | sakal pakkannen tai hotin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गव्हंची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्नें तै होतीं ॥१॥ ऐसा नरदेह उत्तम जाण । वाचे वदे नारायण ॥२॥ द्रव्य जोडितां आपुलें हाती । सकळ पदार्थ घरा येती ॥३॥ भावें करी संतसेवा । एका जनार्दनीं प्रिय देवा ॥४॥