भजनी मालिका
← भजनांकडे परत

गळित झाली काया । हें चि लळित पंढरिराया

galit jhali kaya | hen chi lalit pandhariraya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गळित झाली काया । हें चि लळित पंढरिराया ॥१॥ आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥ वाहिला कळस । तेथें स्थिरावला रस ॥२॥ तुका म्हणे गोड झालें । नारायणीं पोट धालें ॥३॥