भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्भवासीचें दुःख सांगतां आटक । मलमुत्र दाथरीं जननीं जठरीं अधोमुख

garbhavasichen duhkh sangatan atak | malamutra datharin jananin jatharin adhomukh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गर्भवासीचें दुःख सांगतां आटक । मलमुत्र दाथरीं जननीं जठरीं अधोमुख ॥१॥ शिव शिव सोहं सोहं । कोहं कोहं सांडुई पाहे निज जीवन ॥२॥ गर्भवासीचें सांकडे सांगावें कवणापुढे । सर्वांगी विष्टालेपु नाकीं तोंडीं किडे ॥३॥ एका जनार्दनीं भेटी तैं जन्ममरणा तुटी । जननी पयपान पुढती न करणें गोष्टी ॥४॥